श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान
श्री लक्ष्मी नृसिंह महिमा
श्री लक्ष्मी नृसिंह जन्मोत्सव
श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट
नृसिंहअवतार - एक विचार
संपर्क
|| श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ||


 

इसविसनाच्या अकराव्या शतकाच्या अखेरीस श्री लक्ष्मी नृसिंह भक्त कौशिक गोत्री “नृसिंहभट्ट सत्यवादी” (मुळचे गोदतीरीचे) कोकणात धामपुरी समीप मावळंगे गावी सहकुटुंब आले. येथिल श्री नृसिंहाचे स्थान खूप जागृत आहे असे जाणुन श्रींच्या दृष्टांतावरून त्यांनी तेथेच कायमचे वास्तव्य केले. त्यावेळेस नृसिंह मूर्ति एका झाडा खाली आढ्ळुन आली.तेथे त्यांनी एक छोटेसे देऊळ बांधले.

पुढे त्यांचे पुत्र नृसिंहभट्ट यांनी कोल्हापुरी शिलाहार वंशी राजा विजयार्क (इ.स. ११४२ ते ११५४) यांजपासून संगमेश्वर गाव दान मिळवला. नृसिंहभट्टांचा पुत्र कृष्णाजी याने विजयार्काचा पुत्र भोजराजा (इ.स. ११९०) याचे पदरी पराक्रम गाजवून संगमेश्वराची रचना केली व मावळंगे गाव इनाम मिळावून तेथे श्रीं चे देवालय बांधले. तद्नंतर कृश्णाजीचा वंशज केशवनायक याने शके १५५९ ईश्वरनाम संवत्सरे (इ.स. १६३७) पूर्वीच्या देवालयास दगडी घुमट बांधुन लाकडी सभामंडप व आवार याची रचना केली. पुढे सुमारे अडीचशे वर्षे लोटल्यावर मुख्य देवालयाचा जीर्णोद्धार करुन देवळावर मंगलोरी कौलांचे छप्पर उभारण्याचे काम झोंबडीकर सरदेसाई यांनी आपसात वर्गणी उभारून १९१० साली पुरे केले.

यानंतर मंदिराची पुनर्घटना अहमदाबादचे श्री. गणेश वासुदेव मावळंकर यांनी आरंभी केवळ स्वताच्या जबाबदारीवर पुढाकार घेऊन रत्नागिरीचे कंत्राटदार रावसाहेब सिताराम नाना सुर्वे यांच्या हार्दिक साह्याने इ.स. १९३८ सालच्या नृसिंह जयंतीस (१२ मे. १९३८) पुरे केले. तेव्हा सर्वांना हजर रहाणॆ शक्य झाले नाही, म्हणुन २२ नोव्हेंबर १९३८ रोजी पंचम त्रिवार्षिक संमेलन भरवून मंदिराचे उद्घाटन कराण्यात आले. या कामी गोविंद सखाराम सरदेसाई - बडॊदे, गोविंद सखाराम सरदेसाई - कोल्हापुर, नरहर गोपाळ सरदेसाई - पुणे. यांनी गणॆश वासुदेव मावळंकर यांना साहाय्य केले.

पुढे दि. १६-५-२०११ नृसिंह जयंतीच्या वेळी डॉ. त्रिंबक श्रीपाद मावळंकर (गिरगाव, मुंबई) यांनी देणगी च्या स्वरूपात सभामंडपातील व पायरीवरील फरशी व अंगणात पेव्हींग ब्लाक्स बसविल्या.

 

 
.